Pune DagdeShet : उमांगमलज गणेशजन्म सोहळ्यानिमित्त दगडूशेठ बाप्पाला 1100 नारळांचा नैवेद्य
Continues below advertisement
श्री उमांगमलजांचा जन्मोत्सव कार्तिक शुद्ध चतुर्थीला होतो. गाणपत्य संप्रदायात या दिवशी मोरयाला नारिकेला अर्थात नारळ समर्पित करण्याला विशेष महत्व आहे. अंत:करणातील अहंकार आणि ममत्वाचे मळभ दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच्छ, प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडते, त्यांना म्हणतात उमांगमलज. त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत 1100 नारळांचा नैवेद्य दाखविण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नारळांची आरास व धार्मिक विधी यानिमित्ताने मंदिरामध्ये पार पडले.
Continues below advertisement