ज्ञानदेव वानखेडेंच्या मानहानीच्या दाव्यावर बुधवारी सुनावणी,नोटीस मिळाली नाही,मलिकांच्या वकिलांचा दावा

Continues below advertisement

Sameer Wankhede vs Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. समीर वानखेडे यांच्याकडूनही त्यांना उत्तरं दिली जात आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा आरोप म्हणजे, जातीच्या बोगस दाखल्याद्वारे समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवल्याचा हा होय. तसेच समीर वानखेडे जन्मानं मुस्लीम आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे नसून दाऊद वानखेडे असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. मलिकांच्या या आरोपाविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा ठोकला आहे. आज, सोमवारी याची सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram