Cyrus Poonawalla : दोन वेगवेगळ्या लसीचं कॉकटेल करण्याच्या निर्णयाला विरोध : सायरस पूनावाला
पुणे : दर महिन्याला दहा किंवा अकरा कोटी लसीचे डोस देणे अवघड आहे. जगात कोणतीही कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन करू शकत नाही. त्यामुळे लस देण्यासंदर्भातील आकड्याबाबत राजकारणी थापा मारतात, असे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला म्हणाले. तसेच दोन वेगवेगळ्या लसीचं कॉकटेल करण्याच्या निर्णयाला माझा विरोध असल्याचे देखील पूनावाला या वेळी म्हणाले.