Marathi Patrakar Sangh प्रतापसिंह जाधवांना 2020 तर सुधीर जोगळेकरांना 2021 सालचा पत्रकार पुरस्कार जाहीर
गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना 2020 या वर्षासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2021 या वर्षासाठी हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांना घोषित करण्यात आला आहे. 2020 साली कोरोना काळात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळं लागोपाठ दोन वर्षांचे पुरस्कार एकाच कार्यक्रमात देण्यात येतील, असं मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी कळवलं आहे.