पुण्यात क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 33 बुकींना बेड्या, 45 लाखांचा मुद्देमाल जप्त
भारत-इंग्लंड क्रिकेट मॅच सुरू असलेल्या एमसीए मैदानालगतच थाटलेला बुकिंचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात यश आलंय. ही टोळी मैदान परिसरात होती, तिथं सुरू असलेल्या मॅचचं मोबाईल आणि टीव्ही वर 6 ते 13 सेकंद उशिरा प्रक्षेपण व्हायचं. याचा फायदा घेऊन ते अनेकांना सट्टा लावत असे. यासाठी दुर्बीण, स्टील कॅमेऱ्यांमधून प्रत्येक बॉल पण पिंपरी चिंचवड पोलिसांनी मॅच सुरू असतानाच तीन ठिकाणी छापेमारी करून यांचा पर्दाफाश केला. गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला लागूनच असलेल्या घोरवडेश्वर डोंगर आणि बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत तर पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सट्टाबाजार सुरू होता.