कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर मुस्लिम मूलनिवासी मंचाकडून अंत्यसंस्कार, पुण्यात माणुसकीचं दर्शन
कोरोनामुळे पुण्यात भीतीचे वातावरण असल्यानं अनेकदा कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारांसाठी मृतांचे नातेवाईक पुढं येण्याचं टाळतात. अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी गेल्या वर्षभरापासून मुस्लिम मुल निवासी मंचचे अठरा कार्यकर्ते पार पाडतायत. मागील वर्षभरात त्यांनी पी पी ई कीट घालून एक हजार एंशीहुन अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलेत ज्यामध्ये सर्वधर्मीयांचा समावेश आहे.