ABP News

Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात अथर्वशीर्ष पठणाचा अभ्यासक्रम

Continues below advertisement

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत- प्राकृत विभागाकडून अथर्वशीर्ष पठणाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आलाय.  त्यासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ आणि यवतमाळ जिल्ह्य़ातील वणी महाविद्यालयाची मदत घेण्यात आलीय.  संस्कृत विषयाची गोडी वाढावी यासाठी हे पाऊल उचलल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आलय.  अथर्वशीर्षाचा हा कोर्स ऑनलाईन पद्धतीचा असुन तो मोफत उपलब्ध करण्यात आलाय.  या कोर्ससाठी अथर्वशीर्षाचे काही व्हिडीओ वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेत. त्याचबरोबर कोर्स करणार्यांना ऑनलाईन पद्धतीने काही प्रश्नही विचारण्यात येणार आहेत.  कोर्स पूर्ण करणार्यांना एक सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. 21 तासांचा हा कोर्स असणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram