CoronaVirus Update | पुण्यातील दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर : आयुक्त
पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. दोन्ही रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरु आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिली आहे. लोकांनी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी, असं आवाहनही विभागीय आयुक्तांनी केलं आहे.