Coronavirus | पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची संशयित महिला रुग्ण आढळली

पुण्यात कोरोना व्हायरसचे पाच रुग्ण आढळल्यानंतर सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. आता पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोना व्हायरसची संशयित महिला आढळली आहे. संबंधित महिला 27 फेब्रुवारीला दुबईतून भारतात परतली होती. त्यानंतर कालपासून तिच्यात कोरोनाची लक्षणं दिसून येत होती, तिला याचा त्रासही होऊ लागला होता. तातडीने खबरदारी म्हणून महिलेला पुण्याच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola