Coronavirus | पुण्यातील चार पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्रीपासून कर्फ्यू तरीही नागरिक घराबाहेर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात मध्यवर्ती पुण्यातील चार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मोठ्या परिसरामध्ये आज रात्रीपासून कर्फ्यू लावण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. कर्फ्यू लागू झाल्यानंतर या भागातील लोक कोणत्याही कारणास्तव घराच्या बाहेर पडू शकणार नाहीत. फक्त सकाळी दहा ते दुपारी बारा या दोन तासांच्या कालावधीत लोक गरज पडल्यास जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर येऊ शकतील.