Chandrarao Taware On Sharad Pawar : अजित पवारांचं बंड म्हणजे शरद पवारांचंच नाटक
शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांनी पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबाला कारवाई पासून वाचवण्यासाठी पवारांनी पक्षात फूट पाडण्याचं नाटक केलं आहे, असा आरोप तावरे यांनी केला आहे. हे सगळ नाटक 2024च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरू ठेवायचं, आणि तोपर्यात सगळ्या चौकशांमधून क्लीन चिट घ्यायची असा पवारांचा डाव असल्याचा आरोप देखील तावरे यांनी केला आहे. तावरे हे पवारांचे जुने सहकारी असून सध्या ते भाजपमध्ये आहेत. तब्बल ४० वर्षं तावरे पवारांसोबत होते. पावरांच्या पहिल्या निवडणुकीपासून त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा प्रचार केला आहे.