Samarjeet Ghatge speech Kagal: कागलचा कोंढाणा मीच जिंकणार, Hasan Mushrif विरुद्ध रणशिंग फुंकलं

Samarjeet Ghatge speech Kagal: कागलचा कोंढाणा मीच जिंकणार, Hasan Mushrif विरुद्ध रणशिंग फुंकलं

Samarjeetsinh Ghatge: आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापूर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज नाराजीनाट्यावर पडदा टाकताना भाजपसोबत असल्याची टीका केली. मला घालवण्याची घाई कशासाठी? असे सांगत समरजितसिंह घाटगे यांनी भाजपसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. माझे राजकीय गुरू देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील आहेत, पक्षाच्या निर्णयासाठी माणूस मुख्यमंत्री असलेला उपमुख्यमंत्री झाला. हेळसांड, कुचंबणा झाली म्हणून मी गुरू बदलणारा नाही. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत  भाजपमध्येच राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. कागलमध्ये ज्या घडामोडी झाल्या, कोण उपमुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नसल्याचे ते म्हणाले. 
 

पक्षनिष्ठा काय असते मी कागलमधून दाखवून देईन : समरजित घाटगे

भाजप रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सोडणार नसल्याचे सांगत घाटगे यांनी मुश्रीफांच्या मंत्रिपदानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षनिष्ठा काय असते मी कागलमधून दाखवून देईन, असेही ते म्हणाले. अजित पवार यांनी आम्हाला पुरोगामीचं प्रमाणपत्र दिलं. संपूर्ण राज्याचं लक्ष कागलच्या परिवर्तनासाठी लागलं आहे. आज आपल्या विजयाचे भुमीपूजन झालं आहे. आमदारकी लढणार आणि मोठ्या मार्जिननं काढणार आहे. जे झालं आहे ते करेक्ट झालं आहे, 2024 साली डबल मार्जिननं जिंकणार आहे, कागलचा कोंढाणा परत घ्यायचा असे म्हण त्यांनी रणशिंग फुंकले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola