Chandani Chowk Old bridge Demolition : चांदणी चौकातील पूल मध्यरात्री 2 वाजता पाडणार
पुण्याच्या वाहतुकीला अडथळा ठरणारा चांदणी चौकातला पूल आता काही तासांतच जमीनदोस्त होईल. चांदणी चौक पूल पाडण्यासाठी तयारी करण्यात आलीय. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी चांदणी चौकातील कामाची पाहणी केलीय.. आज मध्यरात्री २ वाजता हा पूल पाडण्यात येणार आहे. या वेळी पुलाच्या २०० मीटर परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे. ब्लास्ट करण्याच्या कामासाठी चारशे मीटरच्या अंतरामध्ये ३ इडिफीस इंजिनियरिंग कंपनीचे अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी घटनास्थळी असणार आहेत. स्फोटानंतर धुरळा खाली बसायला १५ मिनीटं लागणार आहेत. स्फोट झाल्यानंतर ढिगारा हटवण्यासाठी ४ बुलडोझर, ८ फोकलेन आणि ३० डम्पर वापरले जातील.