Pune Raid : आंबेगावमधील पराग आणि गोवर्धन दूध डेअरींमध्ये केंद्रीय यंत्रणांकडून छापा
केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा एकदा पुण्यात दाखल झालेत. यावेळी पराग समूहाच्या दूध डेअरीवर हा छापा पडला आहे. आंबेगाव तालुक्यातील गोवर्धन दूध डेअरी आणि पराग दूध डेअरीची तपास यंत्रणांकडून तपासणी सुरू आहे. या डेअरी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांची आहे.