Pune Crime : दंड मागितला म्हणून पुण्यात IT Engineer ने वाहतूक पोलीसाच्या अंगावर घातली गाडी

Continues below advertisement

गेल्या काही दिवसात वाहतूक पोलिसांवर अरेरावी करणाऱ्या आणि दंडाची रक्कम भरण्यास नकार देणाऱ्याची संख्या वाढली आहे. तसेच कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आपलं कर्तव्य करताना वाहतूक पोलिसांना आपला जीव मुठीत धरुन काम करावं लागतं आहे. पुण्यातही असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडलाय. आधीच्या थकलेल्या वाहतूक नियमभंगाच्या दंडाची 400 रुपयांची रक्कम भरायला सांगितल्यानंतर एका कार चालकाने वाहतूक पोलीस हवालदार यांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यांना 700 ते 800 मीटरपर्यंत फरफटत नेलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram