Rain : विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट, परतीच्या पावसानं शेतीच्या नुकसानाची शक्यता
यंदाच्या मोसमात पावसानं रौद्र रुप दाखवलं आणि अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आणि आता जाता जाता देखील पावसानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू उभे केलेत. परतीच्या पावसानं बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोलीसह राज्यातल्या अनेत ठिकाणी उभ्या पीकाचं नुकसान केलंय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं, आज आणि उद्या विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. हिंगोलीत कयाधू नदीला पूर आलाय. बुलढाण्यातही पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसतोय. अनेक ठिकाणी कापूस आणि सोयाबीनच्या पीकाचं मोठं नुकसान झालंय.