Pune : पुण्यातील आंबेगावमध्ये बैलगाडा शर्यतींचा उत्साह , पारंपारिक पद्धतीनं बैलगाडा शर्यती
पुण्यातील आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. आंबेगावमधील लांडेवाडी परिसरात पारंपारिक पद्धतीनं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्याची तयारी पूर्ण करण्यात आलंय. यामुळे बैलगाडा मालकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.