Kirit Somaiya : शिवसेनेच्या 10 गुंडांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, किरीट सोमय्यांचे आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांना महापालिकेच्या ज्या पायऱ्यांवर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याच पायऱ्यांवर भाजपने सोमय्या यांचा सत्कार करणार केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर होणाऱ्या सत्काराला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यानंतर सोमय्यांनी आयुक्तांची भेट घेत निवेदन दिलंय. कोविड सेंटर चालवायला दिलेली कंपनी बोगस असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. याबाबत पालिका आयुक्तांकडे किरीट सोमय्यांनी तक्रार दिली. यावेळी ही कंपनी बोगस असल्याचं आयुक्तांनी मान्य केलंय असा दावा किरीट सोमय्यांनी केलाय. महाविकास आघाडीनं ब्लॅक लिस्ट केलेल्या कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट दिलं. ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिला आहे. यावेळी पुणे महापालिकेसमोर जोरदार राडा झाला.