Petrol Diesel Hike :राज्य सरकारने इंधनावरील VAT कमी करावा, भाजपचं पुण्यात आंदोलन; ठाकरे सरकारवर टीका

राज्य सरकारने इंधनावरील कर कमी करावा या मागणीसाठी पुण्यात भाजपनं आंदोलन केलं आहे. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात हे महात्मा फुले मंडई चौकात हे आंदोलन करण्यात आलं. इंधनाचे वाढत दर पाहता केंद्र सरकारने आपल्या अधिकारातील इंधनावरील पाच ते आठ रुपयांनी कमी केला. त्यानंतर भाजपशासित राज्यांनीही हा निर्णय घेतला. मात्र महाराष्ट्र सरकार इंधनावरील कर कमी करण्याचा निर्णय घेत नसल्याने भाजपने या आंदोलनातून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यावेळी एसटी कर्मचारी संप आणि आरोग्य भरती गोंधळावरुनही सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola