BJP MLA Mukta Tilak Death : मुक्ता टिळक यांना अखेरचा निरोप, Chandrakant Patil यांना अश्रू अनावर

भाजप आमदार मुक्ता टिळक यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सकाळी उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते आणि नागरिकांनी अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहताना चंद्रकात पाटील यांना अश्रू अनावर झाले. शोकसभेत मुक्ता टिळक यांच्या आठवणी सांगताना चंद्रकांत पाटील भावुक झाले.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola