Bhatghar Dam Pune : धरणात पोहण्यासाठी उतरल्यावर वडील आणि मुलीचा मृत्यू
Bhatghar Dam Pune : धरणात पोहण्यासाठी उतरल्यावर वडील आणि मुलीचा मृत्यू पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात बुडून वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील बालेवाडीत राहणारे शिरीष धर्माधिकारी आणि त्यांची १३ वर्षांची मुलगी ऐश्वर्या हे अन्य कुटुंबीयांसह भोर तालुक्यातील जयपाड गावात पर्यटनासाठी गेले होते. भाटघर धरणार पोहण्यासाठी उतरले असता दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ऐश्वर्याचा मृतदेह सापडला आहे, तर वडील शिरीष यांच्या मृतदेहाचा शोध अजूनही सुरू आहे.