Bharat Bandh | पुण्यातील व्यापारी संघटनांचा बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यातील व्यापारी संघटनांनी त्यांची आधीची भूमिका बदलत शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पुण्यातील लक्ष्मी रस्ता असेल किंवा इतर बाजारपेठा या दुपारपर्यंत तरी बंद राहणार आहेत. आधी व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा जाहिर केला मात्र बंदमध्ये सहभागी होणार नाही असं म्हटलं होतं. परंतु बंदला समर्थन देण्यासाठी पुण्यात काढण्यात येणारा मोर्चा मुख्य बाजारपेठेतुन जाणार असल्यानं किमान दुपारपर्यंत या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतलाय.