Supriya Sule Baramati : सुप्रिया सुळेंवर मोठा आरोप, अपक्ष उमेदवारानं केली तक्रार ABP Majha
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या 'मविआ'च्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार संदिप देवकाते यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीये. सुप्रिया सुळेंनी प्रचार संपवून सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार केला असल्याचं देवकातेंनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. तसंच आयोगाने योग्य कारवाई करण्याची मागणी देवकाते यांनी केलीय.