Asad Ahmed Encounter: असदला पुणे, नाशकात अबू सालेमच्या गुंडांची मदत
उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा असदचं काल एन्काऊंटर झालं.. असदला दिल्लीतील एका माजी खासदारानं मदत केली होती, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.. तसंच, उमेश पालची हत्या केल्यावर असद आणि त्याचा शार्पशूटर गुलाम नाशिक आणि पुण्यालाही येऊन गेले.. इथं त्यांना अबू सालेमच्या गुंडांनी मदतही केली.. अबू सालेम आणि अतीक यांची जुनी मैत्री असल्याचं तपासात समोर आलंय.