PUNE : कोरोनाने हिरावला घास, विघ्नहर्ता आला धावून... पुण्यात कलाकार करतायत गणेशमूर्तींची विक्री
कोरोना काळात डबघाईला आलेले उद्योग मध्ये अद्यापही पूर्ववत सुरू झाले नाहीत. त्यामुळे अजूनही अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नंतर अनेकांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. कोरोनाच्या या प्रादुर्भावाचा मोठा फटका चित्रपटसष्टीला बसला आहे. त्यामुळे कलाकारांपासून ते पडद्यामागे काम करणारे देखील भरडले गेले आहेत. परंतु यावरही नाद खरंच पडद्यामागे काम करणाऱ्या काही कलाकारांनी गणेश मूर्ती विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. जंगली महाराज रस्त्यावर गणेश मूर्तीचे स्टॉल लावण्यात आले आहेत.
गणेश मूर्ती विकत घेण्यासाठी देखील या कलाकारांना सुरुवातीला अडचणी येत होत्या. परंतु पत्नीचे दागिने विकून पैसे उभे करत त्यांनी मोठ्या जिद्दीने या व्यवसायाला सुरुवात केली आहे. अडचणीत सापडलेल्या या कलाकारांना आता गरज आहे समाजाच्या मदतीची. सर्वसामान्य नागरिकांनी या कलाकारांनी कडून जर या गणेशमूर्ती खरेदी केला तर त्यांना मोठा आर्थिक फायदा होईल आणि अडचणीतून सावरण्यासाठी मोठा फायदा देखील होईल. या संपूर्ण प्रकाराविषयी बातचीत केली आहे पडद्यामागील कलाकार रणजीत सोनवळे यांच्याशी.