Baramati Lok Sabha : बारामती लोकसभेवरुन महायुतीत राडा, अंकिता पाटलांची दादांवर टीका

Continues below advertisement

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांना महायुतीतूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे.. कारण इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी अजित पवारांविरोधात जाहीर दंड थोपटले आहेत.. इंदापूर विधानसभेसाठी आम्हाला मदत केली तरच बारामती लोकसभेत अजित पवारांच्या उमेदवाराला मदत करु असं अंकिता पाटील म्हणाल्यात.. अंकिता पाटील यांनी अजित पवारांचं नाव न घेता पाठीत खंजीर खुसपल्याचा आरोप केलाय.. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढण्याची शक्यता आहे.. यासाठी अजित पवारांनी आत्तापासूनच तयारीला सुरुवात केलीय.. पण त्यातच अंकिता पाटील यांनी अजित पवारांविरोधात जाहीर वक्तव्य करुन वादाला तोंड फोडलंय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram