Pune : अंनिसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, अविनाश पाटीलांचे आरोप ट्रस्टच्या विश्वस्तांनी फेटाळले
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केलेले आरोप ट्रस्टच्या विश्वस्तांनी फेटाळले आहेत. सात कोटी रुपये निधी असलेल्या ट्रस्टवर हमीद आणि मुक्ता दाभोलकरांनी ताबा मिळवल्याचा आरोप अविनाश पाटील यांनी केला होता. पण हमीद आणि मुक्ता दाभोलकर ट्रस्टच्या कोणत्याही पदावर नसल्याचं स्पष्टीकरण विश्वस्तांनी एका पत्रकाद्वारे दिलंय. उलट दाभोलकर कुटुंबीयांनी समितीच्या साताऱ्यातील कार्यालयासाठी स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध करुन दिल्याचं विश्वस्तांनी स्पष्ट केलंय.
Tags :
Mukta Dabholkar Hamid Dabholkar Andhashraddha Nirmulan Samiti Andhashraddha Nirmulan Samiti Avinash Patil Andhashraddha Nirmulan Samiti Hamid Dabholkar Andhashraddha Nirmulan Samiti Mukta Dabholkar