Pune Kasba Bypolls : मिठगंजमध्ये मतदान न करण्याचे महिलांना धमकी दिल्याचा आरोप, मविआची पत्रकार परिषद

Continues below advertisement

पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आता मतदानाला वेग येतोय...  कसबा पेठमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत सव्वा आठ टक्के तर चिंचवडमध्ये पावणे अकरा टक्के मतदान झालंय..  दोन्ही मतदारसंघात मतदानाला अल्पप्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतंय.. पोटनिवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीये... कसबा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर, भाजप उमेदवार हेमंत रासने, चिंचवडचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे आणि भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावलाय... कसबा पेठ मतदारसंघात दुहेरी लढत होतेय... भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात थेट लढत आहे.... तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत आहे...त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मविआची प्रतिष्ठा पणाला लागलीये..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram