Alandi : इंद्रायणी नदीच्या पाण्याचे नमुने अखेर तपासणीसाठी संकलित
देवाच्या आळंदीत इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडून इंद्रायणी नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेयत. महापालिका हद्दीपासून ते आळंदीपर्यंतच्या नदीपात्रातील पाण्याचे नमुने घेतले असून, नदीच्या प्रदूषणाचं कारण आता पुढे येऊ शकेल.