Ajit Pawar Pune Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, वारी आणि पूरस्थितीबाबत घेणार आढावा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Pune Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, वारी आणि पूरस्थितीबाबत घेणार आढावा
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, लोकसभा निकालानंतर अजितदादांकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, वारी आणि पुण्यातील पूरस्थितीबाबत आढावा घेणार.
लोकसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत नेहमीप्रमाणे त्यांनी सकाळीच या दौऱ्याला सुरुवात केली आहे पुण्यातील सर्किट हाऊस मध्ये अजित पवार अधिकारी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत आज १० वाजता अजित पवार पुण्यातील पावसाने निर्माण होणाऱ्या परिस्थिती संदर्भात बैठक घेणार आहेत त्यासोबतच आषाढी वारी देखील याच महिन्यात आहे. या वारीच्या नियोजनासंदर्भात बैठक घेणार आहेत पुण्यात मागच्या शनिवारी ८ जूनला पावसाने झोडपून काढलं पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला पुण्यात पुरस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असूनदेखील त्यांचं पुण्याकडे दुर्लक्ष होतंय का ? असे प्रश्न निर्माण झाले. यावरून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर आज ते पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत उपययोजनांसंदर्भात चर्चा करणार आहेत.