Pune : पुण्यात आज कोरोना आढावा बैठक, शाळांबाबत काय निर्णय घेणार पालकमंत्री अजित पवार? सर्वांचेच लक्ष
पुण्यात आज पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पुण्यातील शाळांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने भाजपने शाळा सुरु करण्यास विरोध केलाय. काल दिवसभरात पुण्यात 8 हजार 301 रुग्णांची नोंद झाली. पुणे शहरात एका दिवसातील ही कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालकमंत्री अजित पवार शाळांबाबत काय निर्णय घेणार याकडं लक्ष लागलंय.
Tags :
Coronavirus Corona Maharashtra Abp Majha Ajit Pawar Pune Corona Pune Smart Bulletin Ajit Pawar Pune Pune School ABP Majha Coronavirus News Coronavirus Maharashtra Latest Updates ABP Majha