Mumbai Fire:ताडदेवच्या भाटिया रुग्णालयाशेजारील इमारतीला भीषण आग,अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी
मुंबई : ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही इमारत 20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली आहे.
आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून या घटनेत दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी भाटिया रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पावणे आठच्या सुमारास ही आग लेव्हल 3 ची असल्याची अग्निशमन दलाकडून घोषणा करण्यात आली. आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सूरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.