Ajit Pawar : शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यात सर्व बंद राहणार : अजित पवार
पर्यटनस्थळी गर्दी केल्यास निर्बंध वाढवणार असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे. शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यात सर्व बंद राहणार असंही ते म्हणाले. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, कोल्हापूर या सारख्या जिल्ह्यांमध्ये अजुनही कोरोनाचे बऱ्यापैकी रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधे दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडलेले 53 टक्के कोरोना रुग्ण हे 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. पुण्यातील जे लोक फिरायला बाहेर जातायत अशा व्यक्तींना जिल्ह्यात परत आल्यानंतर पंधरा दिवस कॉरन्टाईन करण्याचा विचार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
Tags :
Pune News Ajit Pawar Pune Corona Pune Unlock Pune Weekend Lockdown Ajit Pawar On Pune Corona Ajit Pawar On Pune Unlock