Shivsena Foundation Day : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातल्या आक्रमकतेची लेव्हल कोणती?
मुंबई : मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा आता 55 वा वर्धापन दिन साजरा होत असून, यंदाही वर्धापन दिनावर कोरोनाचे सावट आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायमच आहे. याचमुळे शिवसेनेने यंदाही पक्षाचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.