Ajit Pawar आता किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर; पुणे जिल्हा बँकेला सोमय्या भेट देणार
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आता भाजप नेते किरिट सोमय्या यांच्या निशाण्यावर आलेत. किरिट सोमय्या आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ज्या मालमत्तांमुळे आरोप केले जात आहेत, त्या मालमत्ता आणि संस्थांना किरिट सोमय्या भेटी देणार आहेत.