Ajit Pawar : कुठून अवदसा सुचली आणि राजकारणात आलो...शेतकरी मेळाव्यात दादांचं मिश्किल वक्तव्य
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन ऊसाच्या शेतीची पाहणी केली... यावेळी अजित पवारांनी शेतकऱ्यांनी संबोधित करत काही सल्ले दिले.. शेतकऱ्यांनी राजकारणाच्या चर्चा करत बसण्यापेक्षा लक्ष देऊन शेती करावी असा सल्ला अजित पवारांनी दिला.. तर मला पण शेती आवडते पण कुठून अवदसा सुचली आणि राजकारणात आलो,..असं मिश्किल वक्तव्यही अजित पवारांनी केलं