Ajit Pawar : मविआत जाण्याचा इशारा देणाऱ्या चिंचवडच्या समर्थकांशी अजित पवारांसोबत बैठक

Continues below advertisement

मविआत जाण्याचा इशारा देणाऱ्या चिंचवडच्या समर्थकांची आज अजित पवारांसोबत बैठक. बालेकिल्ल्याला सुरुंग लागू नये म्हणून....!

चिंचवडमधील समर्थकांना अजित पवारांनी बैठकीसाठी बारामतीत बोलावून घेतलंय. चिंचवडची जागा राष्ट्रवादीला सुटली नाही तर आम्ही मविआत प्रवेश करू. असा इशारा या समर्थकांनी थेट अजित पवारांना दिला होता. त्यामुळं भोसरी नंतर चिंचवड विधानसभेतील समर्थकांनी तुतारी फुंकण्याआधीचं अजित पवारांनी या सर्वांना बोलावणं धाडलं आहे. पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागू नये म्हणून, या सर्व समर्थकांसोबत अजित पवार बारामतीत चर्चा करणारेत, त्यांची मनधरणी करणार आहेत. सायंकाळी साडे पाच वाजता ही बैठक पार पडेल.

Ajit Pawar : तू सारखी शिट्टी वाजवतो, मी मगापासून बघितलंय, आता पोलिसांच्या ताब्यात देईन, उत्साही कार्यकर्त्याची अजितदादांकडून फिरकी

सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची जनसन्मान रॅली आज वाई मतदारसंघात दाखल झाली. वाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील हे आमदार आहेत.अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकार शिव, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर आणि त्यांच्या कामांना आदर्श मानून काम करतोय, असं म्हटलं. महायुती सरकारच्या कामांची माहिती अजित पवार यांनी या सभेत दिली. वाई विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर केलेल्या कामांची आणि निधीची माहिती देखील त्यांनी दिली. किसनवीर साखर कारखान्याला कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. यावेळी शिट्या वाजवणाऱ्या एका उत्साही कार्यकर्त्याला अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलनं समजावलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram