Ajay Bhosale on Vishal Agrawal :सुरेंद्र कुमार अग्रवालने छोटा राजनला माझी सुपारी दिली होती-अजय भोसले

Continues below advertisement

Ajay Bhosale on Vishal Agrawal :सुरेंद्र कुमार अग्रवालने छोटा राजनला माझी सुपारी दिली होती-अजय भोसले पुण्याच्या कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणी अटक असलेल्या विशाल अगरवालच्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिलीय. विशाल अगरवालचे वडील सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी 2009 साली शिवसेना नेते अजय भोसले यांच्या हत्येचा सुपारी छोटा राजन टोळीला दिली . अजय भोसले 2009 साली वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांतून निवडणूकीला उभे असताना प्रचारादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या अपघातातुन अजय भोसले बचावले. मात्र त्यानंतर गुन्हा दाखल असुनही सुरेंद्रकुमार अगरवाल यांना अटक झाली नाही.
टिक ट्याक- अजय भोसले विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे छोटा राजनशी संबंध. भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात अग्रवालच्या आजोबांनी घेतली होती छोटा राजनचा मदत.
या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात दाखल झालाय गुन्हा.
मात्र याप्रकरणात मोक्का लावणं अपेक्षित असनाताही पुणे पोलीसांनी केवळ आयपीसीची कलमं लावून गुन्हा दाखल केल आणि आरोपत्रही दाखल करेपर्यंत विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक झाली नव्हती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram