पुण्यातील जम्बो कोविड सेंटरबाहेर कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, 3 महिन्यांपासून पगार थकवल्याचा आरोप
Continues below advertisement
पुण्यातील जंबो कोवीड सेंटर मधील नर्सेस आणि इतर सपोर्टींग स्टाफने कोव्हीड सेंटरच्या गेटवर अचानक आंदोलन सुरू केलय. मागिल तीन महिन्यांपासून साडेचारशे ते पाचशे कर्मचार्यांना पगार मिळालेला नसल्याने या कर्मचार्यांनी आंदोलन सुरू केलय. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती बेस्ट सर्विस या कंपनीच्या माध्यमातून कोव्हीड करण्यात आली होती. परंतु कंपनी जेवढा पगार करारामध्ये ठरला होता तेवढा देत नसल्याचा या कर्मचाऱ्यांचा दावा आहे. जंबो कोवीड सेंट मधे सध्या 165 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र या आंदोलनामुळे त्यांच्या उपचारांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दावा आहे
Continues below advertisement