ABVP Protest at Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांसाठी आंदोलन
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन करण्यात आलं. अश्लील भाषेतील रॅप सॉंग तयार करण्यासाठी परवानगी देणाऱ्या कुलसचिवांना विद्यापीठ पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. त्याचबरोबर विद्यापीठाकडून परीक्षांचा निकाल लावताना ढिसाळपणा दाखवण्यात येत असल्याचाही आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला. या आंदोलनादरम्यान मुख्य सभागृहाच्य दरवाजाच्या काचा फोडण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी याच सभागृहात टेबलवर दारुची बाटली ठेवून रॅप सॉंग शुट करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता.