Plane crashes : पुण्यात कडबनवाडीजवळ एक छोटं विमान कोसळलं, पायलट भावना राठोड या किरकोळ जखमी
Plane crashes : पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात कडबनवाडीजवळ एक छोटं विमान कोसळलंय.. कार्व्हर एव्हिएशन या वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीचं हे विमान आहे. या विमानानं आज सकाळी बारामतीमधून उड्डाण केलं होतं... मात्र हवेत असताना इंधन संपल्यानं हे विमान कडबनवाडीतल्या शेतात कोसळलंय.. या अपघातात विमानाच्या पायलट भावना राठोड या किरकोळ जखमी झाल्या आहेत... त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.