#France मधील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद, ठाण्यामध्ये फ्रान्स राष्ट्राध्यक्षांचा निषेध,पोस्टर्स पायदळी
पॅरिस: फ्रान्सच्या नीस शहरात एका चर्चच्या बाहेर झालेल्या हल्लेखोराने केलेल्या एका हल्ल्यात तीन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात हल्लेखोराने चाकूचा वापर केला आहे. नीसच्या महापौरांच्या मते हा दहशतवादी हल्ला आहे. हल्लेखोराला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरु आहे. 16 ऑक्टोबरला अशाच प्रकारच्या हल्ल्यात एका शिक्षकाचा गळा कापण्यात आला होता.