#CoronaEffect कोरोनामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद यावर्षी ऑनलाईन | कोल्हापूर
Continues below advertisement
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावेळी ऊस दराबाबत आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत ऊस दराबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऊस दराचा प्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता असून यावर तोडगा काढण्यासाठी उद्या तातडीने पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठक बोलवली आहे.या बैठकीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यद्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार खासदार आणि कारखान्याने तसेच शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहेत.
Continues below advertisement