LIC Policty | एलआयसी पॉलिसीधरकांसाठी 10 टक्के आयपीओ राखीव ठेवण्याचा प्रस्ताव विचाराधीन

Continues below advertisement
Budget 2021 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर देशातील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिकांसह सगळ्यांच्या नजरा होत्या. निर्मला सीतारमण यांनी बजट अर्थसंकल्प सादर करताना एलआयसीचा आयपीओ आणण्याबाबत घोषणा केली आहे. एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल असं सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे. याचप्रमाणे आयडीबीआय बँकेचे खासगीकरण करण्यासंदर्भातील घोषणाही निर्मला सीतारमण यांनी केली. निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारीत मांडलेल्या अर्थसंकल्पात प्राथमिक विक्रीद्वारे एलआयसीमधील सरकारी भागभांडवलाची अंशत: विक्री करण्याची घोषणा केली होती. या वर्षी या विक्रीला सुरुवात होणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram