Private Hospital Bill | खाजगी कोविड रुग्णालयातील बिलं सरकारी ऑडिटर तपासणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी आता खाजगी कोविड़ रुग्णालयातील बिलं सरकारी ऑडिटर तपासणार असल्याचं सांगितलं आहे. कोरोना विषाणू उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाजवी आकारणी (बिल) होत असल्याच्या तक्रारींची मुंबई महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने विविध खासगी रुग्णालयांसाठी महापालिका मुख्य लेखापरीक्षक खात्यातील, लेखापरीक्षकांची नेमणूक केली आहे. तेव्हापासून आजपर्यंत 37 रुग्णालयांतील 625 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.
Tags :
Private Hospital Bills Soalpur Corona Hospital Private Hospitals Rajesh Tope On Corona Rajesh Tope Health Minister Coronavirus