President Droupadi Murmu : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा शपथविधी संपन्न : ABP Majha

Droupadi Murmu Oath : भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती (President of India) द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा (N. V. Ramana) यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या होत्या. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola