Sindhudurg च्या वनराईमधून कोसळणारा मांगोलीचा धबधबा, पर्यटकांना आकर्षण : ABP Majha

Continues below advertisement

तळकोकणात महाराष्ट्र गोवा कर्नाटक या तिन्ही राज्याच्या सीमेवर असलेल्या उंच कड्यावरून गर्द वनराईत दाट धुक्यातुन वाट काढत १५० फुटांवरून पांढरा शुभ्र फेसाळत मांगेलीचा धबधबा कोसळत आहे. १५० फुटांवरून कोसळणारा धबधब्याच्या मुळात जाण्यासाठी डोंगरातुन ट्रेकिंगचा आनंदही लुटत जावं लागतं. धबधब्याच्या मुळाशी न जाताही १५० फुटांवरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या आजूबाजूला उभं राहिलं तरी धबधब्याच्या पाण्याचे तुषार आजूबाजूच्या परिसरात ५०० मीटरवर आपोआप भिजवुन ओलाचिंब होण्याचा आनंद घेता येतो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकाच्या सीमेवर असलेला दोडामार्गातील मांगेलीचा धबधब्याचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहवून टाकते. गर्द वनराईतील हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. आंबोली इतकाच निसर्गरम्य असलेला दोडामार्गातील मांगेली येथील धबधब्याला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती मिळते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram