Pravin Darekar | लोकशाहीचा अपमान,कामकाज रेटून नेण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव - प्रविण दरेकर | ABP Majha

उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं बहुमत चाचणीची लढाई जिंकली आहे. ठाकरे सरकारला 169 आमदारांनी पाठिंबा दिला. तर भाजपच्या आमदारांनी सभात्याग केल्यामुळं विरोधात मतदान करणारं सभागृहात कोणीच नव्हतं.  तर मनसेचा 1, माकपचा 1 आणि एमआयएमच्या 2 आमदारांनी कुणाच्याच बाजूनं मतदान न करत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तसंच जनसुराज्यच्या विनायक कोरेंनी महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान न करण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानभवनात शिरणगणतीनुसार बहुमत चाचणी घेण्यात आली. लोकशाहीचा अपमान,कामकाज रेटून नेण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे असं भाजप नेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola