Pratap Sarnaik | ईडीच्या तपासाला सहकार्य करणार, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहणार आहेत. काही वेळात ते ईडी कार्यालयात पोहोचण्याची शक्यता आहे. 24 नोव्हेंबरला प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीनं छापा टाकला होता. टॉप्स ग्रुपमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणात ईडीनं चौकशी सुरु केली आहे. त्यादिवशी ईडीनं प्रताप सरनाईक यांचा मोठा मुलगा विहंगला ताब्यात घेऊन 5 तास चौकशी केली. त्यानंतर विहंगला दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola