अहमदनगरच्या राहातामध्ये डाळींब पिकावर फिरवला नांगर, तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बळीराजा संकटात
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यामध्ये डाळींब बागांवर संक्रांत कोसळली आहे. या पिकांना तेल्या रोगाची बाधा झाल्याने फळांच्या बागा ट्रॅक्टरच्या साहाय्याने उखडून फेकण्याची नामुष्की शेतक-यांवर आलीय. तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तीनशे हेक्टरहून अधिक बागा बाधीत झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून मोठ्या मेहनतीने या डाळिंबाच्या बागा उभ्या केल्या होत्या. मात्र तेल्या रोगामुळे बागांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाला मुकावे लागल्याने, हतबल झालेल्या शेतकऱ्यांना या बागा नष्ट करण्याची दुर्दैवी वेळ आलीय. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकटात दुष्काळात तेरावा महिना असल्याचं चित्र इथे निर्माण झालंय.
Continues below advertisement
Tags :
Pomegranate Pomegranate Farmer Pomegranate Farming Pomegranate Farms Lockdown Damage Farmer Loss Maharashtra Farmer Lockdown In Maharashtra Lockdown Effect